रामरक्षा म्हणा ( रामरक्षा स्तोत्रपठण महत्व )
*रामरक्षा म्हणा...!*
*रोजच्या जीवनातील कुठल्याही प्रहरी रामरक्षा म्हंटली तरी प्रचंड प्रमाणात ऊर्जा तयार होते. जी स्पंदने रामरक्षेतून जागृत होतात, ती दाखविण्यासाठी कुठलाही चश्मा किंवा भींग उपलब्ध नाही, परंतु "स्वानुभव" ह्या एकमेव साधनातून याची प्रचिती येते.*
*घरात एकटे आहात, रामरक्षा म्हणा, कुणी आजारी आहे, त्याच्या बाजूला बसून रामरक्षा म्हणा, प्रवासात आहात, रामरक्षा म्हणा, रस्त्यावरुन एकटे जात आहात, रामरक्षा म्हणा, पहिल्यांदाच प्रेजेंटेशन देणार आहात, रामरक्षा म्हणा, नविन देशात अनोळखी लोकांच्यात आहात, रामरक्षा म्हणा...!*
*आत्तसज्जधनुषा विषुस्पृशा वक्षया शुगनिषङ्ग सङिगनौ ।रक्षणाय मम रामलक्ष्मणा वग्रत: पथि सदैव गच्छताम् ॥२०॥ हा श्र्लोक म्हणताना अंगावर उभा राहणारा काटा अनुभवण्यासारखा असतो.*
*कुठल्याही संकटात असाल, फारच निगेटिव वाटतंय, आपल्या आवडत्या व्यक्तिशी भांडण झालंय, खूप वाईट वाटतंय, रडायला येतंय, एकटं वाटतंय, रामरक्षा म्हणा. कुठल्याही प्रकारचं डिप्रेशन तुम्हाला कधीच येणार नाही. आत्महत्येचे विचार मनाला शीवणारही नाहीत..*
*आस्तिक असाल, नास्तिक असाल तरीही रामरक्षा म्हणा. देवावर नसेल विश्वास पण रामरक्षेवर ठेवा. मोबाईल वर ऐकत असाल तरीही तोंडाने म्हणा. चारचौघात असाल तरीही मध्यमेतून म्हणा.*
*रामरक्षा असा एक रामबाण उपाय आहे, जो तुमचे बारा कधीच वाजू देणार नाही. पटत नसेल तर आजपासून अनुभव घ्यायला सुरुवात करा.*
*🙏🌹 श्रीराम जय राम जय जय राम🌹🙏*
Comments
Post a Comment