पैसे खेचून घरात आणण्यासाठी करा फक्त हे सोपे उपाय.

पैसे खेचून घरात आणण्यासाठी करा फक्त हे सोपे उपाय.





आपल्या घरी पैसे येण्यासाठी करा मिठाचा फक्त हा एक उपाय. पैसे आपल्याकडे आपोआप चालत येईल, माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल व माता लक्ष्मी सदैव आपल्या हातात वास करेल. जेणेकरून आपल्याला पैस्याची कधीच कमतरता भासणार नाही. 

  सर्वप्रथम सकाळी उठल्यावर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर दररोज दोन्ही बाजूला थोडे थोडे पाणी शिंपडावे. हे काम आपल्याला सर्वात आधी करायचे आहे. हा उपाय करत असताना ह्या उपायाबद्दल कोणालाही कळू देऊ नये म्हणजेच कोणालाही सांगू नका हे काम तुम्हाला गपचूप करायचे आहे.
तर हा उपाय असा आहे, आपण घरातील फरशी पुसत असताना जी बादली किंवा जे भांडे घेतात त्यात पाणी घेतल्यानंतर त्या पाण्यात आपल्याला थोडेसे मीठ टाकायचे आहे. हे तुम्ही फारशी पुसत असताना दररोज करा परंतु एक दिवस सोडून तो म्हणजे गुरूवार. हो फक्त गुरुवारचा दिवस सोडून बाकी सर्व दिवस तुम्ही हा उपाय करा असे केल्याने आपला बृहस्पती मजबूत होतो. 
   आणखी एक म्हणजे तुम्ही तुमच्या दररोज अंघोळ करत असता त्या अंघोळीच्या पाण्यात देखील तुम्ही थोडेसे मीठ टाकायचे आहे. हा उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा केला तरी चालेल. हे केल्याने तुमचे ग्रह मजबूत होतात.
    आपण सकाळी पाहतो कि खुप लोक सकाळी दात घासत असताना हिकडे तिकडे फिरत असतात पण हे खूप चुकीची गोष्ट आहे आपण आपले दात स्वतःच करत असताना म्हणजेच ब्रश करत असताना एका जागीच उभा राहून करायचे आहे किंवा बसून करावे. 
    आपल्या घरातील झाडू हा लक्ष्मी चे प्रतीक मानले जाते आणि हा झाडू बाहेरच्या व्यक्तीला कोणाला दिसणार नाही अश्या ठिकाणी ठेवावा. आणि जर तुम्हाला जर एखादा झाडू खरेदी करायचा असेल तर तो फक्त शनिवारच्या दिवशीच खरेदी करावा ते शुभ असते.
    जर तुमच्या घरच्या समोर एखादी गाय आली असेल तर तिला एखादी चपाती किंवा भाकरी जे पण केली असेल घरात ती नक्की खायला घाला त्यामुळे तुम्हाला पुण्य नक्कीच लाभेल. 
   जर तुमच्या घरात नेहमी भाडंन होत असतील किंवा काही वाद होत असेल तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी घरात गोडाची खीर करावी व त्याचा नैवैद्य घरात देवाला दाखवावा व ती खीर घरात सर्वाना खायला द्यावी. त्यामुळे घरातील सर्वांचे वाद मिटतील व घरात पुन्हा नात्यामध्ये गोडवा निर्माण होईल.
    सकाळी उठल्या उठल्या सर्वप्रथम न चुकता सूर्यदेवतेला नमस्कार करावा व दारासमोर एक स्वस्तिक देखील नक्की काढावे.
    हे सगळे उपाय तुम्ही तुमच्या दररोजच्या जीवनात आचरणात आना आणि तुम्हाला नक्की फरक जाणवेल. तुमच्यावरती नक्की लक्ष्मी माता प्रसन्न होतील. व आपल्याला पैस्याची कमी कधीच पडणार नाही.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Comments

Popular posts from this blog

रामरक्षा म्हणा ( रामरक्षा स्तोत्रपठण महत्व )

Shri Swami Samarth Tarak Mantraश्री स्वामी समर्थ तारक मंत्र